Posts

Showing posts from February, 2022

राज आलं जी..

Image
माझा पहिला ब्लॉग राजं तुमच्या चरणी समर्पण. छत्रपती शिवाजी महाराज अनावरण सोहळ्यातील मी अनुभवलेले विलोभनीय ते दैवी दृश्य आपल्या शब्दात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहो..       महाराष्ट्र पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शहरात काल‌ एक ऐतिहासिक घटना घडली...महुर्त १८ फेब्रुवारी २०२२ राञी ११ वाजेचे...शिवरायांच्या ३९० व्या जंयतीचे औचित्य साधून गेल्या चार वर्षांपासून ज्या सुवर्ण क्षणाची संभाजीनगर जिल्हा आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर जवळ आला आणि राञी ११ वाजता छञपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले. तो क्षण मला खरच दिव्यत्वाची अनुभुती देवून गेला.       लाखोंच्या नजरा आतुरतेने एकच दृश्य पाहावयास वाट पाहत होते. संपुर्ण शहर जणु त्या भगव्या रंगाच्या नशेत झिंगून अर्ध्या रात्री ढोल ताश्याच्या तालावर नाचत होते... कित्येक पिढ्या ओलांडल्या या एका पिढीचा इतिहास जपण्याच्या नादात , या अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळ्यात सामील मानव रूपी ही गर्दी केवळ त्या एका नावासाठी आली होती. २१ फुट उंचीवर अश्वारूढ पुतळा ,३१ फुट प्रशस्त चौथरा तर या...