सुर्यदेवाची तथागतांशी सुर्वर्णमयी भेट..
पाषाणी मुर्ती जेव्हा सुवर्णप्रकाशाने उजळुन निघते तेव्हा सुर्यालाही तेज यावे मुर्ती अशी ही तथागथांची बोलते. सायंकाळचा सुवर्णयोग झरोक्यातून घडला असा, अद्वितीय राजयोग म्हणावा जसा, स्वतः सूर्य देव आपल्या किरणांनी गौतम बुद्धांना अभिषेक घालण्यासाठी या दिवसाची वाट बघत होते. तो क्षण आणि ती जागा ह्या दोन्ही गोष्टी विचार कराव्यात इतकं सोप्प नाही कारण आजही माणसांना विचार करण्यास भाग पाडणाऱ्या एलोरा येथील त्या ऐतिहासिक लेण्यांमधील चैत्य लेणी नंबर 10 मधील गौतम बुद्धांच्या प्रकृतीचा एक अद्वितीय राजयोग असा घडावा खरच डोळे दिपवणारा हा क्षण.. जेव्हा एका छोट्याशा झरोक्यातून अंधारातील पाशानी मुर्तीला सुर्यदेव आपल्या प्रकाशाने सुवर्ण रुप आणतात तेव्हा तो क्षण तेजोमय दिव्यत्वाची प्रचिती देणारा असतो. दरवर्षी 10 ते 13 मार्च सायंकाळी ४ ते ५.३० यादरम्यान मावळत्या सूर्याची सुवर्णमयी किरणे आपली दिशा बदलत लेणीच्या झरोक्यातून आत शिरतात आणि स्तुपा समोरील सिंहासनावर तथागत गौतम बुद्धाच्या ध्यानमुद्रेतील मूर्तीवर जाऊन विसावतात. हा दुर्मिळ क्षण असा जुळून येतो की, सूर्याचे तेज बुद्धीच्या...