राज आलं जी..


माझा पहिला ब्लॉग राजं तुमच्या चरणी समर्पण.



छत्रपती शिवाजी महाराज अनावरण सोहळ्यातील मी अनुभवलेले विलोभनीय ते दैवी दृश्य आपल्या शब्दात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहो.. 

     महाराष्ट्र पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शहरात काल‌ एक ऐतिहासिक घटना घडली...महुर्त १८ फेब्रुवारी २०२२ राञी ११ वाजेचे...शिवरायांच्या ३९० व्या जंयतीचे औचित्य साधून गेल्या चार वर्षांपासून ज्या सुवर्ण क्षणाची संभाजीनगर जिल्हा आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर जवळ आला आणि राञी ११ वाजता छञपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले. तो क्षण मला खरच दिव्यत्वाची अनुभुती देवून गेला. 
     लाखोंच्या नजरा आतुरतेने एकच दृश्य पाहावयास वाट पाहत होते. संपुर्ण शहर जणु त्या भगव्या रंगाच्या नशेत झिंगून अर्ध्या रात्री ढोल ताश्याच्या तालावर नाचत होते... कित्येक पिढ्या ओलांडल्या या एका पिढीचा इतिहास जपण्याच्या नादात , या अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळ्यात सामील मानव रूपी ही गर्दी केवळ त्या एका नावासाठी आली होती. २१ फुट उंचीवर अश्वारूढ पुतळा ,३१ फुट प्रशस्त चौथरा तर या पुतळ्याचे वजन हे सुमारे ७ मेट्रिक टन असुन पुतळ्यावर २४ कमानीत महाराजांचे २४ मावळे दिमाखात उभे आहेत आपल्या राजाच्या सुरक्षेसाठी. या पुतळ्याचे अनावरण पर्यटन मंत्री आदित्य उद्धव ठाकरे , पालकमंत्री सुभाष देसाई आणि इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
     चहुबाजूंनी नजर फिरेल तिकडे शिवप्रेमींचा जनसागर उसलेला होता. आसमंतात ढोल ताशांचा गजर आणि मुखात फक्त जय भवानी जय शिवाजीचा नारा. संपुर्ण क्रांतीचौक शिवघोषानी आणि रोषणाईने उजळून निघाला. मुर्तीचे काय वर्णावे स्वरुप, शेवटी राजाच तो ! 
     एवढ्या गर्दीत अचानक मुर्ती वरील पडदा सरकला, सगळ्यांच्या नजरेत फक्त तेव्हा आपलं राजं होतं. फटाक्यांच्या आतिशबाजीने अश्वारूढ महाराजांची ती प्रतिकृती अगदी देखणी झाली. आसमंतांत नुसता जल्लोष आणि मागच्या बाजूचा तिरंगाही महाराजांच्या स्वागतात शानाने वाऱ्याच्या रागावर फडकत होता. पुतळ्या वरच्या पुष्पवृष्टीने अजूनच त्या क्षणाला आपल्या पाकळ्यांमध्ये बंदिस्त केले. आणि राजे क्रांती चौकात लाखो मावळ्यांच्या साक्षीने अश्वारूढ होऊन विराजमान झाले. या सगळ्यात मुख्य भाग म्हणजे महाराजांची किर्ती तिथे प्रत्येकाला जाणवली. कारण एवढ्या  जनसमुदायाला आपला राजा हा जागेवरुन दिसला. तो क्षण ज्याने शांत मनाने टिपला त्याला नक्कीच महाराजांचं अस्तित्व तिथे जाणवलं असणार. हा खरच संभाजीनगरकरांसाठीचा मानाचा सुवर्णक्षण होता. सोहळा खरच दैदिप्यमान होता. संभाजीनगरच्या इतिहासातलं सोनेरी पान म्हणजे अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण.. 
     छञपती शिवाजी महाराज म्हणजे इतिहासाच्या पानांवर, रयतेच्या मनावर राज्य करणारा जाणता राजा. असंख्य राजे झाले माञ जगाचा कैवारी एकच माझा शिवबा, कर्तृत्वाने जग जिंकले जाते याच सर्व श्रेष्ठ उदाहरण म्हणजेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज.. या इतिहासाच्या पानाला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही पाईक आहोत. महाराजांनी केलेल्या कार्याला अखंड पुढे नेत, त्यांच्या आज्ञेच पालन करा, महाराजांचे विचार नुसते ऐकू नका तर आत्मसात करून आचरणात आणा तेव्हाच आपण शिवप्रेमी आहोत आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो याचा खरा अभिमान वाटेल.

अखंड जनमानसाला शिवजयंतीच्या मनःपुर्वक शुभेच्छा...!

 जय भवानी , जय शिवाजी..!

 - करण कोठेकर.

Comments

  1. सुंदर वर्णन केलेस, जे हा सोहळा आपल्या डोळ्यांनी बघायला तिथे नव्हते त्यांनी हे वाचले तरी सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहील अश्या शब्दात तु मांडलस, सुंदर खूप सुंदर

    ReplyDelete
  2. Bahva khup mst lihaly..keep it up

    ReplyDelete
  3. जणू संपूर्ण सोहळा स्वतः बघितला असे वाटले.
    मस्तच एकदम 👌👌

    ReplyDelete
  4. मोजकेच शब्द....पण सुंदर मांडणी.....

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. खूप सुंदर लिहलय दादा ��

    ReplyDelete
  7. Replies
    1. आपले आभार मानले तितके कमी आहे..🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सुर्यदेवाची तथागतांशी सुर्वर्णमयी भेट..

स्थापना कला